सावित्रीबाई फुले
जन्म
सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते .1840 साली त्यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईं निरक्षर होत्या . ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना त्यांच्या घरी शिक्षण दिले. आणि त्यांना शिक्षिका बनवले .सावित्रीबाईंची जन्मतारीख म्हणजे 3 जानेवारी हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो.
शैक्षणिक व सामाजिक कार्य
सावित्रीबाई आणि ज्योतिराव यांनी 1848 मध्ये भिडे वाड्यात पुण्यात मुलींची या शाळेची स्थापना केली त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात सावित्रीबाईंनी महाराष्ट्रात सामाजिक सुधारणा करण्यासाठी खूप प्रयत्न केले त्यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला. बाल जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या 12 तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या त्या काळात पुनर्विवाह मान्य नव्हता त्यामुळे बऱ्याच समस्या निर्माण होत ज्योतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंध गृह चालू केले सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले..1896 /97 साली पुण्यात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला होता. आजार अनेक जीवांचे जीव घेऊन गेला. सावित्रीबाईंनी प्लेग पीडीतांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाने यांच्या मळावर दवाखाना सुरू केला. त्या रोगांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागले. प्लेगच्या रोगांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला त्यातून 10 मार्च 1897 रोजी त्यांचे निधन झाले
सावित्रीबाईंची पुस्तके काव्यसंग्रह
◆बावनकशी
◆काव्य फुले काव्यसंग्रह
◆सावित्रीबाईंची गाणी
◆सुबोध रत्नाकर
◆ज्योतिबांची भाषणे संपादक सावित्रीबाई फुले
मृत्यू 10 मार्च 1897मध्ये झाला.
No comments:
Post a Comment