जन्म
भिमराव रामजी आंबेडकर तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये झाला. त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार किंवा आधुनिक भारताचे निर्माते असेही म्हणतात. त्यांचा जन्म महू या ठिकाणी झाला ते अस्पृश्य असल्यामुळे त्यांच्यासोबत नेहमी सामाजिक आर्थिक भेदभाव केला गेला .1894 मध्ये सुभेदार रामजी सकपाळ इंग्रजी सैन्यातील मुख्याध्यापक पदाच्या नोकरीवरून निवृत्त झाले .1896 मध्ये आंबेडकरांच्या आई-भिमाबाईंचे निधन झाले .त्यावेळी आंबेडकर पाच वर्षांचे होते 1896 मध्ये सातारा येथील कॅम्प स्कूलमध्ये भीमरावांचे नाव दाखल केले.
उच्च शिक्षण
1913 मध्ये शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी प्रयाण केले. बाबासाहेब हे अर्थशास्त्रामध्ये पीएचडी पदवी मिळणारी पहिली भारतीय व्यक्ती होत त्यांनी 1896 ते 1923 अशा 27 वर्षात मुंबई विद्यापीठ कोलंबिया विद्यापीठ लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रीस इन या शिक्षण संस्था मधून उच्च शिक्षण घेतले।
.आंबेडकरांनी या दरम्यान बीए,दोनदा एम ए , पीएचडी ,एम एस सी ,बार ऍट लॉ आणि डी एस सी या पदव्या मिळवल्या. 1950 च्या दशकात त्यांना एल एल डी आणि डिलीट या पदव्या प्रदान करण्यात आल्या.
संविधानाची निर्मिती
भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत मोठा सहभाग असल्यामुळे आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार किंवा भारतीय संविधानाचे निर्माते म्हटले जाते . डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र भारताचे पहिले कायदा व न्याय मंत्री झाले.भारतीय घटना समितीने एकूण 22 समित्या स्थापन केल्या होत्या त्यातील बारा समित्या या विशेष कामकाजासाठी होत्या तर दहा समित्या या कार्यपद्धतीशी निगडित होत्या.
सन्मान पुरस्कार आणि पदव्या
बाबासाहेबांना 1990 मध्ये भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला .डॉक्टर ऑफ लॉ ही पदवी पाच जून 1952 रोजी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाने दिली . डिलीट ही सन्माननीय पदवी 1953 रोजी तेलंगणा राज्यातील उस्मानिया विद्यापीठाने दिले . काठमांडू नेपाळ येथे झालेल्या जागतिक बौद्ध परिषदेत बौद्ध भिक्खूंनी त्यांना बोधिसत्व ही उपाधी प्रदान केली .दलाई लामा यांनी सुद्धा त्यांना बोधिसत्व म्हटले.
मृत्यू
6 डिसेंबर 1956 रोजी नवी दिल्ली येथे झाला.
No comments:
Post a Comment