महात्मा फुले
जन्म -
महात्मा फुले यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले असे होते. त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 मध्ये कटगुण सातारा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव व आईचे नाव चिमणाबाई होते.त्यांचे मूळ आडनाव गोरे हे होते. पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले.ज्योतिबांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला. 1842 मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूल मध्ये त्यांनी प्रवेश घेतला. शाळेत ते शिस्तप्रिय हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जात होते.
शैक्षणिक कार्य
बहुजन समाजाचे अज्ञान दारिद्र्य नष्ट करण्यासाठी त्यांनी 1948 साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे वाड्या येथे मुलींची पहिली शाळा काढली. आणि शिक्षिकेची भूमिका पत्नी सावित्रीबाई वर सोपवलं. त्यानंतर त्यांनी अस्पृश्यांसाठी देखील शाळा सुरू केल्या.
विद्येविना मती गेली
मतीविना नीती गेली
नितीविना गती गेली
गती विना वित्त गेले
वित्तविनाशुद्र खचले
इतके अनर्थ एका अविद्येने केले.
सामाजिक कार्य -
थॉमस पिन यांचे मानवी हक्कावर लिहिलेले पुस्तक त्यांच्या भाषणात आले आणि त्याचा प्रभाव त्यांच्या मनावर झाला कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वरण व जातीभेद ही निर्मिती मानवाचीच आहे असे ते म्हणाले परंतु या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची विचारसरणी होती. 24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली समाजातील समता नष्ट करणे आणि शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचवली हे समाजाचे ध्येय होते न्यायापासून अत्याचारांपासून व गुलामगिरीतून सुद्रातील शूद्र समाजाचे मुक्तता करणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते
लेखन कार्य -
सार्वजनिक सत्यधर्म हा सत्यशोधक समाजाचा ग्रंथ मानला जातो. दीनबंधू हे मुखपत्र म्हणून साप्ताहिक चालवली जाई.
त्यांनी गुलामगिरी हा ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्गीयांना समर्पित केला. अस्पृश्यांची कैफियत हा महात्मा फुले यांचा प्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर 1891 मध्ये प्रकाशित झाला. त्याचबरोबर शेतकऱ्याचा आसूड, गुलामगिरी या ग्रंथाचे देखील लेखन केले.
महात्मा
११ मे १८८ मध्ये मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादूर विठ्ठलराव वडेकर यांच्या हस्ते सत्कार करून महात्मा ही पदवी त्यांना प्रदान केली.
मृत्यू
28 नोव्हेंबर 1890 मध्ये त्यांचे पुणे येथे निधन झाले.
No comments:
Post a Comment